‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. मालिकेत सर्व काही सुरळीत होत असतान लकीने गोंधळ घातला. आरतीच्या पोटात वाढत असलेले बाळ हे लकीचे आहे हे कळाल्यावर सर्वांना धक्काच बसला. सावनी या संधीचा फायदा घेते. ती आरतीला भडकवते आणि लकी विरोधात तक्रार करायला भाग पाडते. पण आता सावनीचा डाव अपयशी ठरला आहे. त्यामुळे आजच्या भागात काय होणार? चला जाणून घेऊया…