गेल्या काही दिवसांपासून ‘येक नंबर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याचे म्हटले जात होते. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील दिसणार असल्याचे म्हटले जात होते. आता चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील मलायकाचा जलवा पाहण्यासारखा आहे.