Viral Video : सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हिडीओमुळे शाहरुख-सलमानचे चाहते भिडले! नेमकं काय झालं बघाच…


Viral Video On Social Media : बॉलिवूड किंग शाहरुख खान याचे चाहते अभिनेता सलमान खानच्या एका चाहत्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करत आहेत. सलमान खानचा चाहता सुरजीत हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजर आहे. या युजरने आपल्या बायोमध्ये दावा केला आहे की, तो सलमान खानचा मोठा फॅन आहे. या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया आयडीवरून आयफा २०२४चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आयफा २०२४ होस्ट करताना टेलिप्रॉम्पटरचा वापर करताना दिसत आहे. हा टेलिप्रॉम्प्टर प्रेक्षकांच्या मागे ठेवण्यात आला असून, त्यात आयफा २०२४ची स्क्रिप्ट मोठ्या अक्षरात लिहिलेली दिसत आहे, जी शाहरुख स्टेजवर उभा राहून वाचत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24