मुंबई33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. त्याच्याच पिस्तुलातून त्याने गोळी झाडली होती. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
दिव्य मराठीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूक साफ करताना मिस फायरिंगमुळे गोविंदाला गोळी लागली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचे रिव्हॉल्व्हर ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी परमजीत सिंह दहिया यांनी सांगितले की, ज्या बंदुकातून गोळी झाडण्यात आली ती बंदूक परवानाधारक आहे. याबाबत डीसीपी लवकरच अधिकृत निवेदन देणार आहेत.
मुंबईच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल
गोळी लागल्याने त्याच्या पायातून खूप रक्त वाहत होते, त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. सध्या त्यांना अंधेरीच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पायातली गोळी काढण्यात आली आहे.
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोलकात्याला रवाना होणार होता गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, ते एका कार्यक्रमासाठी कोलकाता येथे जात होते. फ्लाइट 6 वाजता होती. पिस्तूल कपाटात ठेवत असतानाच मिसफायर झाले आणि त्याच्या गुडघ्याखाली गोळी लागली. त्यांना तातडीने अंधेरीच्या रुग्णालयात नेण्यात आले. गोळी बाहेर काढण्यात आली आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घाबरण्याची गरज नाही.
कुली नंबर 1, हिरो नंबर 1, राजा बाबू, छोटे सरकार, हद कर दी आपने यांसारख्या चित्रपटांचा भाग असलेला गोविंदा गेल्या 5 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. 2019 चा रंगीला राजा हा त्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट आहे.