Bigg Boss Marathi Day 60: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगत चालला आहे. या शोमध्ये पार पडणारे टास्क हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक टास्क पार पडला. या टास्कमध्ये अभिजीत सावंतने निक्की तांबोळीची नक्कल केली आहे. तर अंकिता वालावलकरने जान्हवी किल्लेकरची नक्कल केली. दोघांचा हा नक्कल करतानाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही हसू अनावर होईल.