शिल्पा आणि रोमितचा ब्रेकअप का झाला?
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शिल्पाने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल सांगितले. शिल्पा म्हणाली होती की, ‘मी माझ्या लग्नासाठी सर्वस्व पणाला लावले होते. एक मुलगी असल्याने माझी, नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाप्रती काय जबाबदारी आहे, हे मला ठाऊक होतं. त्यामुळे मी त्याच्या इच्छेनुसार सर्व काही करत होते. पण तरीही त्याला माझ्याकडून जास्त अपेक्षा होत्या. माझी लग्नाची तयारी केली होती, लग्नाचा ड्रेस खरेदी केला होता, मी माझे दागिने विकत घेतले होते आणि कार्ड्सही छापले होते. लग्नाच्या एक महिना आधी मला ब्रेकअप करावा लागला. हे खूप दु:खद आहे, पण मला वाटते मी योग्य निर्णय घेतला. मला खूप आनंद आहे की निदान आता मला प्रत्येक गोष्टीसाठी अॅडजस्टमेंट करावी लागत नाही. मी आता माझे निर्णय स्वत: घेऊ शकतो.’