दिव्य मराठी नेटवर्क| मुंबई1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक

- बॉलीवूडच्या ९३ वर्षांच्या इतिहासात सर्वात यशस्वी लहान बजेट चित्रपट
सिने बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री-२’ चा स्वप्नवत प्रवास सुरूच आहे. फक्त ५० कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने २१ सप्टेंबरपर्यंत ५६३ कोटींची कमाई केली. राजकुमार राव-श्रद्धा कपूरसारखी कमी पगाराची स्टारकास्ट असूनही चित्रपटाने खर्चावर १०२६% नफा कमावला. कम्प्लिट सिनेमा फिल्म ट्रेड मॅगझिनच्या अतुल मोहनच्या मते, या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, यशासाठी मोठी स्टारकास्ट किंवा बजेट आवश्यक नसते. आशय चांगला असेल तर चित्रपट यशस्वी होतो.
शाहरुख खानचा ‘जवान’ हा आजवरचा यशस्वी हिंदी चित्रपट ठरला असेल, पण देशातील कमाई खर्चाच्या दुप्पटही नाही. चित्रपटाचे बजेट ३०० कोटी होते. चित्रपटाला त्याच्या खर्चावर केवळ ८३% नफा मिळू शकला. म्हणजेच ‘स्त्री-२’ ने ६ पट जास्त तर ‘जवान’ ११ पटीने मागे आहे. या वर्गात फक्त ‘गदर-२’ हे ‘स्त्री-२’ च्या जवळ आहे. सनी देओलचा हा चित्रपट ६० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. म्हणजे त्याचा नफा ७५९% होता. दक्षिणेत, विशेषत: तेलुगू सिनेमांमध्ये पॅन इंडिया चित्रपटांचा ट्रेंड आहे. एस राजामौलीच्या ‘बाहुबली- २’ ने हिंदीसह सर्व भाषांमध्ये एकूण १४०० कोटींची कमाई केली होती. २५० कोटींच्या खर्चाच्या तुलनेत नफा ४६०% होता. त्याच वेळी सर्व भाषांमध्ये ‘स्त्री-२’ ची कमाई ७०२ कोटी रुपये होती. म्हणजे नफा १३०४% होता.
छोट्या बजेटचा चित्रपट हे यशाचे उत्तम उदाहरण हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर छोट्या बजेटच्या मोठ्या यशाचे उदाहरण जय संतोषी माँ (१९७५) चित्रपटाने दिले. हा चित्रपट २५ लाखांत बनला होता, पण त्याने ५ कोटींची कमाई केली होती. पण ‘स्त्री-२’ ने अनेक बाबतीत याला मागे सोडले. ९३ वर्षांच्या इतिहासातील (अालमआरा – १९३१ पर्यंत) सर्वात यशस्वी लघु बजेट चित्रपट मानला जाऊ शकतो.
-कोमल नाहटा, चित्रपट समीक्षक
