बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शो’चा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये ‘जिग्रा’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. दिग्दर्शक करण जोहर, आलिया भट्ट आणि वेदांत रैना हे तीनही कलाकार कपिल शर्मासोबत मजा मस्ती करताना दिसले. दरम्यान, शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नातील फोटो दाखवले. हे फोटो दाखवत असताना त्याने करण जोहरला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.