सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखवणार्या ‘गाथा नवनाथांची’ ह्या पौराणिक मालिकेवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले. मालिकेत आत्तापर्यंत नवनाथांचे अवतार, त्यांचा प्रवास आणि चमत्कार हे सर्व दाखवण्यात आले आहे. सध्या नाथांचे प्रवास व त्यांचे चमत्कार भक्त प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सुरुवातीपासूनच नाथांचा जन्म, त्यांची जडणघडण, शिकवण, गुरु-शिष्य परंपरा असा प्रत्येक नाथाचा प्रवास पाहायला मिळाला. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक नवी अपडेट समोर येत आहे. या मालिकेच्या वेळात बदल करण्यात आला आहे.