गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. तसेच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे. कारण छोट्या पडद्यावर हा चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे पाहायला मिळणार हा चित्रपट…