गेल्या काही दिवसांपासून मालिका विश्वामध्ये धुमाकूळ सुरु आहे. अनेक नव्या मालिका सुरु होत आहेत. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका मालिकेचा प्रोमो व्हायरल झाला आहे. कारण ही मालिका एका अतिशय वेगळ्या विषयावर आधारित आहे. या मालिकेचे नाव ‘बाईपण भारी रं’ असे आहे. आता या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.