सध्या सगळीकडे लाइव्ह कॉन्सर्ट, स्टँडअप कॉमेडी शोची क्रेझ पाहायला मिळते. अनेकजण या शोची तिकिटे ऑनलाइन बुक करताना दिसतात. मुंबईत जानेवारी महिन्यात ग्रॅमी अवॉर्ड विजेता पॉप बँड कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टची तिकिटे बुक माय शो या वेब साईटवर विक्रिसाठी ठेवण्यात आली होती. पण देशभरातील चाहत्यांना हा कॉन्सर्ट पाहायचा असल्यामुळे तिकिट विक्रीची साईट क्रॅश झाली होती. फार कमी लोकांना याचे तिकिट मिळाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कॉन्सर्टचे तिकिट मिळाल्यावर त्याची काय प्रतिक्रिया आहे हे पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.