Bigg Boss Marathi 5 Update: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांसाठी चाहते सध्या नवस करताना दिसत आहेत. आज या घरातील सदस्यांना खास सरप्राईज मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच विशेष ठरणार आहे. आज ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची संपूर्ण टीम म्हणजेच स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ घरात जाणार आहेत. घरातील स्पर्धकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा ताई आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी रंगणार आहे. ती पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.