Laughter Chefs Mishappening with Rahul Vaidya: कलर्सचा रिअॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ’ सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. अनेक टीव्ही कलाकार आपल्या उपस्थितीने या शोला चार चाँद लावताना दिसतात. पण यादरम्यान कुकिंग शोबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. नुकताच ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर अभिनेत्री रीम शेखसोबत मोठा अपघात झाला होता. त्यापाठोपाठ गायक राहुल वैद्य देखील अपघाताला बळी पडला आहे. अचानक आग राहुलच्या अंगावर आली आहे.