अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादाला लावणार फुला: ‘प्राजक्ता’च्या ‘फुलवंती’चा दमदार टीझर रिलीज


मुंबई11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादाला लावणार फुला अशा संवादाने प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी यांची मुख्य भूमिका असलेला फुलवंती चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये प्राजक्ताचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. हा च‍ित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बाबासाहेब पुरंदरेंच्या कांदबरीवर आधारित चित्रपट

हा सिनेमा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘फुलवंती’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटात पेशवाई काळातील प्रसिद्ध नर्तिका आणि पंडीत व्यंकटशास्त्री यांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात भव्य दिव्य असे अप्रतिम सेट्स पाहण्यास मिळणार आहे. प्राजक्ता माळी, गश्मिर महाजनी यांच्यासह प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

अभिनेत्रीचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

फुलवंती चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री स्नेहल विठ्ठल तरडे हिने केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्नेहल तरडेने दिग्दर्शन क्षेत्रात पाउल टाकले आहे. चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण तरडे याने केले असून छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. तर संगिताची कमाण अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे.

प्राजक्ताचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शिवोऽहम् प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत फुलवंती सिनेमाची निर्मिती केली आहे. यासोबतच तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. मंगेश पवार, अभिषेक पाठक, श्वेता माळी, प्राजक्ता माळी आणि कुमार मंगत पाठक हे निर्माते आहेत.

हेही वाचा…

कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटावर 25 सप्टेंबरपर्यंत निर्णय:मुंबई उच्च न्यायालयाने CBFC ला फटकारले, म्हणाले- गडबडीच्या भीतीने प्रमाणपत्र देण्यास नकार देऊ शकत नाही

कंगनाच्या वादग्रस्त चित्रपट इमर्जन्सीबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कंगना आणि झी स्टुडिओने ही याचिका दाखल केली आहे. सीबीएफसी (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने यापूर्वी चित्रपटाला प्रमाणपत्र दिले होते, परंतु 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होण्याच्या 4 दिवस आधी त्यावर बंदी घातली होती यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. आज न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत केवळ गडबड होण्याची भीती दाखवून अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोखता येणार नाही, असे म्हटले होते. सीबीएफसीला प्रमाणीकरण प्रकरणावर निर्णय घ्यावा लागेल. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24