भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स सध्या अंतराळात अडकली आहे. आज १९ सप्टेंबर रोजी ती पृथ्वीपासून ४०० किलोमीटरवर अंतराळात आपला ५९ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. वाढदिवशी सुनीता विल्यम्सला भारताकडून एक अनोखी भेट देण्यात आली आहे. प्रसिद्ध म्युझिक कंपनी सारेगामाने ही भेट दिली आहे. या गिफ्टमध्ये प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचे “बार बार दिन ये आये” या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. काही संगीतकार, गायक आणि सेलिब्रिटींचा एक ग्रुप तयार केला असून ते हे गाणे गाताना दिसत आहेत.