नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना एका युजरने असे म्हटले आहे की, ‘एखाद्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातून जाणे, हे वैयक्तिक नुकसान आहे आणि त्याचे दु:खही वैयक्तिक आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की,’हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अपंग आहे, आपण काय करतोय? याचा भान असायला हवा.’ तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘ही फक्त रील नाही, हा एक मानसिक आजार आहे, जो वेगाने पसरत आहे. या व्हिडिओत दुःखापेक्षा दिखावाच जास्त आहे.’ तर, एका युजरने असे म्हटले आहे की,’या व्हिडिओत झोपलेला व्यक्ती मृत असल्याचे नाटक करत असल्याचे दिसत आहे. कदाचित रील बनवण्यासाठी असा प्रकार सुरू आहे.’