13 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बागी ४’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. १ मिनिट ४९ सेकंदाच्या या टीझरमध्ये टायगर श्रॉफ आणि संजय दत्तचा खतरनाक अवतार पाहायला मिळतोय. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा टीझर कसा आहे?
टीझरच्या सुरुवातीला, पार्श्वभूमीत टायगर श्रॉफचा आवाज ऐकू येतो, ज्यामध्ये तो म्हणतो,’जरूरत और जरूरी में फर्क होता है। अलीशा तेरी जरूरत थी और मेरे लिए जरूरी.’ चित्रपटाचा खलनायक संजय दत्त आणि नायक टायगर श्रॉफ यांना पडद्यावर दाखवले जाते. टीझरमध्ये केवळ टायगर आणि संजय दत्त यांच्यातच नाही, तर हरनाज संधू आणि सोमन बाजवा यांच्यातही जबरदस्त अॅक्शन आणि रक्तपात दिसून येतो.

‘बागी’ चित्रपटाचा टीझर ‘अॅनिमल’ ची कॉपी आहे का?
‘बागी ४’ च्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टायगर श्रॉफच्या दमदार अॅक्शन आणि संजय दत्तच्या धोकादायक खलनायकाच्या अवताराचे सर्वजण कौतुक करत आहेत. मात्र, आता या टीझरबद्दल सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे की हा टीझर रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची हुबेहूब कॉपी आहे का? कारण टीझरच्या पार्श्वसंगीतापासून ते त्यात दाखवलेल्या गाण्यांपर्यंत आणि रक्तपाताच्या दृश्यांमुळे लोकांना ‘अॅनिमल’ची आठवण येत आहे.

बागी ४ कधी रिलीज होईल?
‘बागी ४’ हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट ए. हर्ष यांनी दिग्दर्शित केला आहे, तर त्याचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. हा ‘बागी ४’ हा चित्रपट बागी फ्रँचायझीचा चौथा भाग आहे, जो पूर्वीपेक्षा अधिक दमदार अॅक्शनसह परतत आहे.