मुंबई5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

2018 मधील #MeToo मोहिमेदरम्यान चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. नुकताच तिने स्वतःचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, या व्हिडीओत ती ढसाढसा रडताना दिसत आहे. “माझ्यावर माझ्याच घरात मानसिक त्रास होत आहे,” असा आरोप करत तिने मदतीची आर्त विनंती केली आहे. या व्हिडिओनंतर तनुश्रीने माध्यमांशी बातचीत करताना तिच्या आरोपांचा सिक्वेलच सादर केला. तसेच तिने यावेळी देखील अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
तनुश्री दत्ताने ABP माझाशी बोलताना सांगितले, “कालचा व्हिडिओ म्हणजे 4-5 वर्षांचा राग, फस्ट्रेशन एकत्र बाहेर आले. मागच्या काही वर्षात इतक्या वाईट आणि विचित्र घटना घडल्या आहे. 2020 पासून आलेल्या फिल्म प्रोजेक्ट साबोटाइज करण्यात आले. माझी छोटी मोठी कामे काढून घेण्यात आलीत. माझे ई मेल, व्हाट्सअॅप, फोन नंबर हॅक करण्यात आले. एक ग्रुप आहे. ते मिळून मला त्रास देत आहेत. माझ्याविषयी लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.
उज्जैनमध्ये माझ्या वाहनाचे ब्रेक फेल केले होते
तनुश्री पुढे म्हणाली, 2020 मध्ये मी उज्जेनला गेले होते. माझ्या घरात एक बाई ठेवली होती. जी माझ्या खाण्या पिण्यात अशा काही गोष्टी घालायची ज्यामुळे मी आजारी पडायचे. 12-16 तास मला शुद्ध नसायची. तिथे माझा अपघात झाला होता. माझ्या ऑटोचे ब्रेक कोणी कापले होते. असे दोन वेळा झाले. माझी तब्येत 2-3 महिने ठीक नव्हती. मला समजले की माझा पाठलाग केला जात आहे. माझ्या घराची चावी कोणाकडे होती. माझ्या घरातील सामान इकडे तिकडे केले जात होते. माझ्या घरात घुसून माझ्या खाण्यात काही मिक्स केले जात होते.”
नाना पाटेकर एकटे नाही, माफिया गँग आहे
तनुश्रीला कोण त्रास देत आहे? याबाबत विचारले असता ती म्हणाली, “कन्फर्म स्टेटमेंट मला द्यायचे नाही. 2018 नंतर अशा घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. त्याआधी आयुष्यात माझा कधी अपघात झाला नव्हता. माझ्याबरोबर अशा घटना घडल्या नव्हत्या. मला असा अनुभव आला नव्हता. 2018 मध्ये नाना पाटेकरांवर आरोप केले होते.” नाना पाटेकरांचा याच्याशी काही संबंध आहे या गोष्टींचा असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “याच्याशी ते कॉमन कनेक्शन आहे. ज्याला कोणाला हे कळतंय की मला त्रास दिला जातोय, तो देखील पहिला विचार हाच करत आहे. नाना पाटेकर एकटे नाही, तर बॉलिवूडमध्ये जी माफिया गँग आहे. जो अशा काळ्या धंद्यामध्ये सहभागी आहे.”
सुशांत सिंगसोबत जे-जे झाले, ते-ते माझ्यासोबत होतंय
तनुश्रीने सांगितले, “माफीया गँगमध्ये कोण कोण आहेत हे मी स्पेसिफिक सांगू शकत नाही. सुशांत सिंहराजपूतबरोबर जे जे होत होते ते सगळे माझ्याबरोबर होतंय. फरक फक्त एवढाच आहे की तो या जगात नाही. मी या जगात आहे. कारण मी सुशांतच्या केसचा अभ्यास केला होता. माझ्याबरोबरही तेच होत आहे, पण मी माझे संतुलन ढासळू दिले नाही. कारण मी कृष्ण भक्त आणि शिव भक्त आहे. मी त्यांना माझा सारथी बनवले. माझ्या आजूबाजूला महाभारत होत आहे. मला फक्त सरळ चालायचे आहे आणि स्थिर राहायचे आहे.”
कोणती तक्रार करावी, ते कळत नाहीये
या प्रकरणी पुन्हा तक्रार करणार का? असे विचारले असता तनुश्री म्हणाली, “कोणत्या प्रकारची तक्रार करायची हे मला कळत नाहीये. कारण मी व्हिजिबली जे पाहत आहे तेव्हा असं दिसतंय की गँग एक मॉब स्टॉकिंग आहे. जे माझा पाठलाग करत आहेत ते नेहमी तेच नसतात. नेहमी सेम व्यक्ती नसतात. मी उज्जेनला जाते तिथे वेगळे लोक असतात. मी कामाख्याला जाते तिथे वेगळे लोक असतात. मुंबईत वेगळे लोक असतात. अपघात झाला तेव्हा वेगळे लोक होते.”
मीटू केस केल्याने काहींचा अहंकार दुखावला
लोक तुझ्याच मागे का लागले आहेत? असे विचारले असता तनुश्री म्हणाली, ”स्वाभाविक बाब आहे कारण मी त्यांच्यावर मीटू केस लावली आहे. ही शैतान मंडळी आहेत. त्यांच्यावर जेव्हा केस होते तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला जातो. त्यामुळे समोरच्याला त्यांना उद्धवस्त करायचे असते. पाच वर्षात खूप गोष्टी घडत आहेत. त्यावर मी एक पुस्तक लिहू शकते.”
मराठी माणूस असल्याने पाटेकरला पाठिंबा
“मी तक्रार केली पण काय झाले? इथे आऊटसाइडर्स मेला, एक मराठी माणूस क्रिमिनल जरी असला तरी त्याला पोलिसांचा पाठिंबा मिळतो. स्वाभाविक बाब आहे. असे व्हायला नको. मंत्री देखील त्यांना सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांची हिंमत वाढते. मग त्यांचा इगो वाढतो. मग त्याच्या मनात आले असणार की हिला मी इंगा दाखवतो. हिला त्रास देऊन देऊन मी हिला संपवून टाकेन”, असेही तनुश्री म्हणाली.
नाना पाटेकर मोठा अभिनेता नाही
तनुश्री म्हणाली, “नाना पाटेकर मोठा अभिनेता नाहीये. 2018 मध्ये मी जेव्हा त्याच्याबरोबर काम केले तेव्हा त्याच्याकडे एकही फोटो नव्हता. त्याच्याकडे एकही सिनेमा नव्हता. प्रोड्यूसर, डायरेक्टर माझ्याकडे भीक मागत आले होते की, तुम्ही सिनेमा केला तर सिनेमा चालेल. तो जर इतका मोठा अभिनेता असता, तर त्यांना आयटम साँगसाठी मला घ्यावे लागले नसते. नाना पाटेकर ऑन पेपर लेजेड्री स्टेटस आहे. पण प्रत्यक्षात 2018 मध्ये त्याच्याकडे एकही प्रोजेक्ट नव्हता. तेव्हा मी मोठी अॅक्टर होती. जगात देशात लोक मला ओळखत होते. तेव्हा माझा बोलबाला होता. तेव्हा लोक मला ओळखत होते.
प्रसिद्धीसाठी माझ्यासोबत कॉन्ट्रोव्हर्सी केली
70 दशकात त्याचे सिनेमे आले होते. त्यातही त्याने पॅरेलल सिनेमात काम केले होते. मी कॅरेक्टर रोल केलेत. मी लीड रोल केलेत. त्याने माझ्या प्रसिद्धीचा वापर करून त्याचे करिअर वाढवण्यासाठी माझ्याबरोबर कॉन्ट्रोव्हर्सी केली. त्याला माहिती होते तो काय करतोय. मला मुद्दाम सिनेमात आणले गेले. माझ्या सहानुभूतीचा चुकीचा वापर केला गेला. तो सिनेमा 2 वर्ष डब्यात बंद होता. प्रोड्यूसर, डायरेक्टर रडत माझ्याकडे आले होते. नाना पाटेकर बरोबर कोणी काम करायला तयार नव्हते, कारण त्याचा एटिट्यूट खूप खराब होता.”