Order banning dj is not limited to ganeshotsav it applies to all processions says bombay high court

गणेशोत्सवादरम्यान डीजेचा (DJ Sound0 वापर आरोग्यासाठी हानिकारक असेल, तर ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्येही ते हानिकारक ठरणार आहे. त्यामुळे वेगळ्या आदेशाची गरज नाही, असे उच्च न्यायालयाने (bombay high court) बुधवारी स्पष्ट केले. 

सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर बीमच्या हानिकारक परिणामांबाबत याचिकाकर्ते न्यायालयात कोणताही शास्त्रीय अभ्यास मांडू शकले नाहीत.

न्यायालयाने सरकारला तसा अभ्यास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. मात्र, याचिकेद्वारे ही मागणी करण्यापूर्वी याचिकाकर्त्यांनी नीट अभ्यास करायला हवा होता, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

याचिकाकर्त्याने लेझर बीमच्या दुष्परिणामांचे संशोधन का केले नाही? मोबाईल टॉवर्सबद्दल खूप टिका होते, पण तुम्ही त्याबद्दलचे वैज्ञानिक अहवाल पाहिले आहेत का? असा सवाल देखील न्यायालयाने उपस्थित केला.

अशा प्रकरणांमध्ये शास्त्रीय पुराव्याशिवाय निकाल कसा द्यायचा? असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला.

किंबहुना, याचिकाकर्त्यांनी वैज्ञानिक अभ्यासाचा हवाला देऊन त्या संदर्भात प्रभावी आदेश देण्यासाठी न्यायालयाला सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु, बहुतांश याचिकाकर्ते योग्य अभ्यास न करता याचिका दाखल करतात.

या प्रकरणातही याचिकाकर्त्यांनी लेझर बीम वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ही मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, आम्ही या विषयात तज्ज्ञ नाही. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील ओवेस पेचकर यांनी आपल्या मताचे पुरावे न्यायालयाला दिले. त्यावर लेखांतून मतं मांडली आहेत. हा वैज्ञानिक अभ्यास नाही. तज्ञांची मते भिन्न असू शकतात प्रत्येकाला असे वाटते की त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे.

ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक अभ्यासाचे पुरावे देण्याचे निर्देश दिले. मात्र, पेचकर यांनी आपल्याला अशा कोणत्याही अभ्यासाची माहिती नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आधी अशा विषयांवर अधिक संशोधन व्हायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24