सुमारे ३.१ अब्ज डॉलर्सच्या करारात लष्कराची ताकद वाढविण्यासाठी भारताने अमेरिकेकडून ३१ एमक्यू-९ बी विमानांच्या खरेदीबाबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अंदाजित खर्चामध्ये शस्त्रास्त्रे, सेन्सर्स, ग्राउंड कंट्रोल स्टेशन, ग्राउंड डेटा टर्मिनल्स, ग्राउंड हँडलिंग उपकरणे, सुटे भाग आणि लॉजिस्टिक सपोर्ट चा समावेश आहे. १५ यूएव्ही नौदलासाठी, तर लष्कर आणि भारतीय हवाई दलासाठी प्रत्येकी आठ यूएव्ही असतील.