बुध ग्रहाचे कन्या राशीतले संक्रमण या ६ राशींना देईल विशेष लाभ-
बुध हा कन्या राशीचा अधिपती ग्रह आहे. अशा स्थितीत बुधाचे स्वतःच्या राशीत होणारे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी, सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी बुध कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीतील बुधाचे संक्रमण वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी चांगले राहणार आहे.