खेडेगावातील महिला सरपंचाचं मंचावर फाडफाड इंग्रजी, ऐकून आयएएस टीना दाबी झाल्या थक्क!-woman sarpanch leaves ias tina dabi surprised with her fluent english in viral video ,देश-विदेश बातम्या

IAS Tina Dabi Surprised With Woman Sarpanch Fluent English: आयपीएस अधिकारी टीना दाबी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. २०१५ साली यूपीएससी परीक्षेत टॉपर राहिलेल्या टीना दाबी नुकत्याच नुकत्याच प्रसूती रजेवरून परतल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडे बारमेर जिल्ह्याची कमान देण्यात आली. टीना दाबी यांची खासियत म्हणजे त्या आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या संपर्कात राहतात. सध्या सोशल मीडियावर टीना दाबी यांच्या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत खेडेगावातील एक सरपंच महिला मंजावर उभी राहून गावकऱ्यांना संबोधित करत आहे. मात्र, ही महिला हिंदी किंवा इतर भाषेत न बोलता अस्खलित इंग्रजीत भाषण करते, हे पाहून मंचावर उपस्थित असलेल्या टीना दाबी देखील आश्चर्यचकीत होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24