‘राहुल गांधी देशातील नंबर वन दहशतवादी, त्यांना पकडण्यासाठी.. ‘, केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांना देशातील एक नंबरचे दहशतवादी म्हटले आहे. विरोधी पक्षनेत्यावर टीका करताना बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी यांनी शीखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत, पण त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी हे देशातील नंबर वन दहशतवादी आहेत. जे लोक नेहमी मारण्याच्या गप्पा मारतात, जहाजे आणि रेल्वे उडवून देण्याची भाषा करतात… ते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही अंदाज लावू शकता. माझ्या मते जर कुणाला पकडल्याबद्दल बक्षीस द्यायचे असेल तर ते राहुल गांधी आहेत.राहुल गांधी हे देशाचे सर्वात मोठे शत्रू असल्याचेही बिट्टू यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24