Port Blair Name Changed : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत केंद्रशासित प्रदेश अंदमान व निकोबार बेटांची राजधानी असलेल्या बोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) ही घोषणा केली. केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची (Andaman and Nicobar ) राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं असून पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. अमित शहा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे.