158 ganesh mandals awaiting permission from thane municipal corporation

ठाणे महापालिका (thane municipal corporation) प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांसाठी अर्ज केलेल्या 307 मंडळांपैकी 149 मंडळांना परवानगी दिली आहे. उर्वरित 158 मंडळांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.  या मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही 158 मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.

ठाणे (thane) महापालिका क्षेत्रात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या (high court) निर्देशानुसार मंडळांसाठी नियमावली केली आहे.

नियमावलीनुसार मंडळांनी मंडपाच्या बांधकामासाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. त्याची पाहणी केल्यानंतर पालिका प्रशासन मंडपाच्या बांधकामास मान्यता देते. यामध्ये मंडळांना वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. या प्रमाणपत्रानंतरच पालिकेकडून मंडप बांधकामाची अंतिम परवानगी दिली जाते.

मात्र या प्रक्रियेमुळे परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने मंडळांना मंडप बांधण्यासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पालिकेने मंडळांच्या मागणीनुसार एक खिडकी योजना राबविण्यास सुरुवात केली. तसेच, ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा पालिका उपलब्ध करून देत आहे.

यंदाही ठाणे महापालिकेने मंडळांना तशाच सुविधा दिल्या असल्या तरी त्यात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन दल यांच्याकडून आवश्यक परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घेऊन मंडळांकडून परवानगीचे अर्ज तातडीने प्रभाग समिती स्तरावर पाठवावेत.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24