Metro 3 project only 724 out of 3093 trees were replanted

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या स्थानकांच्या बांधकामासाठी 3093 झाडांची कत्तल करण्यात आली होती. तोडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल, याची ग्वाही मुंबई (mumbai) मेट्रो (metro)रेल कॉर्पोरेशनने दिली होती. पण अद्याप 3093 झाडांपैकी केवळ 724 झाडांचे पुनर्रोपण झाले आहे. यासंपूर्ण प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीने नाराजी व्यक्त केली.

झाडे लावण्याबाबतच्या समस्येचे निराकारण करण्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा सहकार्य विभागाला या स्थानकांना भेट देण्याचे आदेश दिले. आतापर्यंत 36 हजार झाडे लावल्याचा आणि त्यांची काळजी घेतली जात असल्याचा दावा एमएमआरसीएलने केला होता. या सगळ्या झाडांचे जिओ टॅगिंग करण्याचे आदेश समितीने एमएमआरसीएलला दिले आहेत. मात्र, अद्याप ते करण्यात आलेले नाही याबाबत द्विसदस्यीय विशेष समितीने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला.

तसेच, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह प्रकल्प आणि तंत्रज्ञान संचालकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच स्थानक परिसरातील झाडांचे पुनर्संचयन का केले जात नाही, पुनर्संचयित झाडांचे जिओटॅगिंग अद्याप का केले गेले नाही? याचा जाबही विचारला आहे. 

एमएमआरसीएलच्या वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर समितीने यासंदर्भातील आदेशाचे पालन करण्यासाठी एमएमआरसीएलला आणखी एक संधी दिली.


हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24