Akshaya Trititya 2025: महिलांनी चुकूनही ‘या’ रंगाची साडी अक्षय्य तृतीयेला नेसू नये! तर ‘हा’ रंग आहे शुभ

Akshaya Trititya 2025 : हिंदू धर्माच अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला गेला असून यादिवशी शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जात नाही. यादिवशी केलेल्या कामांना अक्षय प्राप्त होतो अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला गेला आहे. या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होतं म्हणून या दिवसाला अक्षय्यतृतीया असं म्हटलं जातं. हिंदू धर्मानुसार कृत, त्रेता, द्वापार आणि कली यातले प्रथम जे कृतयुह त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी तुमच्या कामात यश मिळावं म्हणून हिंदू धर्मात काही नियम सांगण्यात आले आहेत. यादिवशी कोणत्या गोष्टी करु नयेत आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले गेले आहेत, सर्व काही एका क्लिकवर जाणून घ्या. 

ज्योतिषीशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या या दिवशी तुम्ही परिधान केलेल्या कपड्यातून एक सकारात्मक उर्जा मिळत असते. रंग हे देखील सुख समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे. प्रत्येक रंगामागे एक महत्त्व असतो. त्यामुळेच नवरात्रीतील नऊ रंगाला विशेष महत्त्व असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ ठरेल आणि कोणत्या रंगाचे नाहीत ते पाहूयात. 

ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला पांढरा रंगाचे कपडे घालणे शुभ मानले गेले आहे. पांढरा रंग हा पवित्रता, शांतता, आणि आध्यात्मिकतेचे प्रतिक मानले गेले आहे. तर पिवळा किंवा सोनेरी रंग हा ज्ञान, समृद्धी, आणि शुभत्वचं प्रतिक आहे. तसंच लाल, गुलाबी हे शक्ती, प्रेम, आणि नवीन सुरुवात याचं प्रतिक मानलं गेलं आहे. हिरवा रंग हा वाढ, नवसंकल्प, आणि ताजेपणाचा प्रतिक मानला गेला आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करु शकता. मात्र यादिवशी चुकून कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत याबद्दलही जाणून घ्या. अक्षय्य तृतीयेला काळा अशुभ मानला गेला आहे. कारण हा हिंदू परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानतात. त्यासोबत तुम्ही राखाडी आणि गडद रंगाचे कपडे देखील घालू नका. कारण हे उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जाचे जनक मानले गेले आहेत. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Akshaya Trititya 2025 : हिंदू धर्माच अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला गेला असून यादिवशी शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जात नाही. यादिवशी केलेल्या कामांना अक्षय प्राप्त होतो अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला गेला आहे. या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होतं म्हणून या दिवसाला अक्षय्यतृतीया असं म्हटलं जातं. हिंदू धर्मानुसार कृत, त्रेता, द्वापार आणि कली यातले प्रथम जे कृतयुह त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी तुमच्या कामात यश मिळावं म्हणून हिंदू धर्मात काही नियम सांगण्यात आले आहेत. यादिवशी कोणत्या गोष्टी करु नयेत आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले गेले आहेत, सर्व काही एका क्लिकवर जाणून घ्या. 

ज्योतिषीशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या या दिवशी तुम्ही परिधान केलेल्या कपड्यातून एक सकारात्मक उर्जा मिळत असते. रंग हे देखील सुख समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे. प्रत्येक रंगामागे एक महत्त्व असतो. त्यामुळेच नवरात्रीतील नऊ रंगाला विशेष महत्त्व असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ ठरेल आणि कोणत्या रंगाचे नाहीत ते पाहूयात. 

ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला पांढरा रंगाचे कपडे घालणे शुभ मानले गेले आहे. पांढरा रंग हा पवित्रता, शांतता, आणि आध्यात्मिकतेचे प्रतिक मानले गेले आहे. तर पिवळा किंवा सोनेरी रंग हा ज्ञान, समृद्धी, आणि शुभत्वचं प्रतिक आहे. तसंच लाल, गुलाबी हे शक्ती, प्रेम, आणि नवीन सुरुवात याचं प्रतिक मानलं गेलं आहे. हिरवा रंग हा वाढ, नवसंकल्प, आणि ताजेपणाचा प्रतिक मानला गेला आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करु शकता. मात्र यादिवशी चुकून कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत याबद्दलही जाणून घ्या. अक्षय्य तृतीयेला काळा अशुभ मानला गेला आहे. कारण हा हिंदू परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानतात. त्यासोबत तुम्ही राखाडी आणि गडद रंगाचे कपडे देखील घालू नका. कारण हे उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जाचे जनक मानले गेले आहेत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ph222 login app