Akshaya Tritiya Date : वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया असं म्हणतात. चार मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. हा श्राद्ध दिवस मानला जात असून हा दिवस पितरांचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त चांगला आहे. जी अक्षय्य तृतीया ही जेव्हा बुधवारी आणि रोहिमी नक्षत्रवर येते ती सर्वात महत्त्वाची आणि महापुण्यकारक मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय्य टिकते. म्हणून तसंच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो. (Akshaya Tritiya 2025 Date Is April 29 or 30 Know the auspicious time and importance shubh muhurat and significance)
अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडले?
श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडोत, श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा. युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा, कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते. पांडवांच्याही मनात – ध्यानात कृष्ण असायचे. ते सुखात असोत किंवा दु:खात, त्यांना कृष्णाची आठवण व्हायची. लढाई अगर दानधर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योद्य ते उपदेश करायचे.
एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्णही होतंच. पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले. एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले, चर्चा करता करता विषय निघाला. धर्मराज फार धार्मिक त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा, यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल? त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारलं. श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे, या दिवशी होमहवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरीता, वाडवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म तर्पण, दानधर्म करावे. अशाप्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते. सदैव अक्षय्य राहते. धर्माला ते ऐकून फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया, म्हणून या तिथीला नाव पडलं अक्षय्य तृतीया.
यंदा अक्षय्य तृतीया 29 कि 30 एप्रिल?
पंचांग, वैशाख, शुक्ल पक्ष तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 05:31 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 02:12 पर्यंत चालेल. उदया तिथीनुसार, 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होईल.
अक्षय्य तृतीया पूजा मुहूर्त: सकाळी 05:41 ते दुपारी 12:18
कालावधी – 06 तास 37 मिनिटे
सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीया सोने खरेदीची वेळ – 29 एप्रिल 05:31 PM ते 30 एप्रिल 05:41 AM
कालावधी – 12 तास 11 मिनिटे
अक्षय्य तृतीयेचा शुभ चौघड्याचा मुहूर्त
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ)- रात्री 08:16 ते रात्री 09:37
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – 10:57 PM ते 03:00 AM, 30 एप्रिल
सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त 30 एप्रिल 2025
अक्षय्य तृतीया सोने खरेदीची वेळ: सकाळी 05:41 ते दुपारी 02:12
कालावधी – 08 तास 30 मिनिटे
अक्षय्य तृतीयेचा शुभ चौघड्याचा मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (शुभ) – सकाळी 10:39 ते दुपारी 12:18
सकाळचा मुहूर्त (लाभ, अमृत) – 05:41 AM ते 09:00 AM
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Akshaya Tritiya Date : वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया असं म्हणतात. चार मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. हा श्राद्ध दिवस मानला जात असून हा दिवस पितरांचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त चांगला आहे. जी अक्षय्य तृतीया ही जेव्हा बुधवारी आणि रोहिमी नक्षत्रवर येते ती सर्वात महत्त्वाची आणि महापुण्यकारक मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय्य टिकते. म्हणून तसंच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो. (Akshaya Tritiya 2025 Date Is April 29 or 30 Know the auspicious time and importance shubh muhurat and significance)
अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडले?
श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडोत, श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा. युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा, कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते. पांडवांच्याही मनात – ध्यानात कृष्ण असायचे. ते सुखात असोत किंवा दु:खात, त्यांना कृष्णाची आठवण व्हायची. लढाई अगर दानधर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योद्य ते उपदेश करायचे.
एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्णही होतंच. पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले. एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले, चर्चा करता करता विषय निघाला. धर्मराज फार धार्मिक त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा, यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल? त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारलं. श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे, या दिवशी होमहवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरीता, वाडवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म तर्पण, दानधर्म करावे. अशाप्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते. सदैव अक्षय्य राहते. धर्माला ते ऐकून फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया, म्हणून या तिथीला नाव पडलं अक्षय्य तृतीया.
यंदा अक्षय्य तृतीया 29 कि 30 एप्रिल?
पंचांग, वैशाख, शुक्ल पक्ष तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 05:31 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 02:12 पर्यंत चालेल. उदया तिथीनुसार, 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होईल.
अक्षय्य तृतीया पूजा मुहूर्त: सकाळी 05:41 ते दुपारी 12:18
कालावधी - 06 तास 37 मिनिटे
सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीया सोने खरेदीची वेळ - 29 एप्रिल 05:31 PM ते 30 एप्रिल 05:41 AM
कालावधी - 12 तास 11 मिनिटे
अक्षय्य तृतीयेचा शुभ चौघड्याचा मुहूर्त
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ)- रात्री 08:16 ते रात्री 09:37
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) - 10:57 PM ते 03:00 AM, 30 एप्रिल
सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त 30 एप्रिल 2025
अक्षय्य तृतीया सोने खरेदीची वेळ: सकाळी 05:41 ते दुपारी 02:12
कालावधी - 08 तास 30 मिनिटे
अक्षय्य तृतीयेचा शुभ चौघड्याचा मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (शुभ) - सकाळी 10:39 ते दुपारी 12:18
सकाळचा मुहूर्त (लाभ, अमृत) - 05:41 AM ते 09:00 AM
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
[ad_3]
Source link