आज सोमवार ७ ऑक्टोबर रोजी, चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी असून, या दिवशी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गेचे पाचवे रूप असलेल्या स्कंदमातेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात ५ राशींना नवरात्रीच्या पाचव्या दिवशी फायदा होईल.