आज सोमवार ३० सप्टेंबर रोजी, चंद्र रात्रंदिवस सिंह राशीत भ्रमण करणार असून गुरु चंद्रापासून दहाव्या भावात असल्यामुळे अमला योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी सोम प्रदोष व्रत आणि त्रयोदशी तिथीचे श्राद्धही केले जाईल. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी अमला योग, शुक्ल योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा फायदा होईल.