आज सोमवार २३ सप्टेंबर रोजी, चंद्र दिवसरात्र वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या तिथीला षष्ठी तिथीचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षाच्या सहाव्या दिवशी सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग या ५ राशींना लाभदायक ठरेल.