अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते? ‘या’ दिवशी अनंत सूत्र बांधण्याचे अगणित फायदे!


Anant Chaturdashi 2024 : भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचं व्रत पाळलं जातं. हिंदू धर्मानुसार श्री हरीच्या अनंत रूपाची पूजा अनंत चतुर्दशीला करण्यात येते. अशी मान्यता आहे यावेळी श्री विष्णूची पूजा केल्यास जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. त्याशिवाय हरीची वर्षभर पूजा केल्या 14 वर्षांपर्यंत अनंत फळ प्राप्त होतं. 

अशी मान्यता आहे की, या व्रताच्या वैभवातून पांडवांनाही हरवलेले राज्य मिळालंय. यंदा अनंत चतुर्दशी तिथी 17 सप्टेंबर 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. 

अनंत चतुर्दशी व्रत कथा 

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी सुमंत नावाचा ब्राह्मण त्याच्या मुली दीक्षा आणि सुशीला यांच्यासोबत राहत होता. सुशीला विवाहयोग्य झाली तेव्हा तिच्या आईचं निधन झालं. सुमंतने आपली मुलगी सुशीला हिचा विवाह कौंदिन्य ऋषीशी केला. कौंदिन्य ऋषी सुशीलासोबत त्यांच्या आश्रमात जात होतं, पण वाटेत रात्र झाली आणि ते एका ठिकाणी थांबले. त्या ठिकाणी काही महिला अनंत चतुर्दशी व्रताला पूजा करत होत्या.

त्या व्रताचा महिमा सुशीलाने महिलांकडून शिकून घेतला आणि तिने सुद्धा अनंत धागा 14 गाठी घालून ऋषी कौंदिन्याकडे आला. पण ऋषी कौंडिण्य यांनी तो धागा तोडून आगीत टाकला, यामुळे भगवान अनंत सूत्राचा अपमान झाला. श्री हरींच्या अनंत रूपाचा अपमान झाल्यावर कौंडिण्य ऋषींची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी जीवन जगू लागले.

मग कौंदिन्य ऋषी तो अनंत धागा मिळवण्यासाठी जंगलात भटकू लागले. एके दिवशी भूक आणि तहानने तो जमिनीवर कोसळला. तेव्हा भगवान अनंत प्रकट झाले. ते म्हणाले की, कौंडिन्या तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत करा आणि 14 वर्षे हे व्रत करा. त्याच्या प्रभावाने तुमचे जीवन आनंदी होईल आणि तुमची संपत्तीही परत येईल. कौंदिन्य ऋषींनी तेच केले, त्यानंतर त्यांची संपत्ती आणि धनसंपदा परत आली आणि जीवन आनंदी झाले.

तेव्हा पासून अनंत चतुर्दशीला अनंत सूत्र बांधण्याची परंपरा सुरु झाली. या धाग्यामुळे प्रत्येक दुःख आणि दैन्यातुन मुक्त मिळते अशी मान्यता आहे. हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो आणि त्याला 14 गाठी असतात. हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि महिलांच्या डाव्या हाताला बांधला जातो. 

ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा. 

अनंत सूत्र बांधल्यानंतर किमान 14 दिवस मांसाहार, मद्य, तसंच शारीरिक संबंध टाळावेत असे धर्मशास्त्र सांगण्यात आलंय. 

शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

हे अनंत सूत्र धारण केल्याने भगवान विष्णूची कृपा भक्तांवर राहते आणि त्यांना सुख, समृद्धी आणि वैभवही प्राप्त होते. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24