Raksha Bandhan Tilak Vidhi : श्रावण महिन्यातील दुसरा महत्त्वाचा सण जो भावा बहिणीसाठी अतिशय खास असतो. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधतात आणि भावाच्या आनंदी जीवनाची कामना करतात. राखी बांधण्यापूर्वी बहीण तिच्या भावाच्या कपाळावर अक्षत आणि कुंकूने टिळा लावून औक्षण करतात. त्याच वेळी, भाऊ प्रत्येक कठीण काळात आपल्या बहिणीला साथ देण्याची वचन देखील देतात. बऱ्याच वेळा, जाणूनबुजून किंवा नकळत, बहिणी राखी बांधताना आणि भावाला टिळा लावताना अनेक चुका करतात, पण भावाला टिळा लावताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. भावाला टिळा लावण्याचे धार्मिक शास्त्रात नियम आहेत. भावाला टिळा लावण्याची पद्धत आणि नियमाबद्दल धर्मशास्त्र तज्ज्ञ मयंक कुशवाहा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओद्वारे सांगितलं आहे. (raksha bandhan 2025 tilak Vidhi in marathi avoid these mistake while applying tilak on brother forehead )
भावाला टिळा कसा लावायचा?
मयंक कुशवाहा सांगतात की, भावाला टिळा लावताना 99 टक्के बहिणी ही चूका करतात. ते म्हणालेत, भावाला कधीही टिळा हा अंगठ्याने लावू नये. अंगठा हा अग्नी तत्त्वाशी जोडला गेला आहे. अंगठ्याने टिळा केल्याने त्या व्यक्तीच्या रागात वाढ होते. त्यासोबत त्या व्यक्तीच्या आयुष्यात वादळ येण्याची शक्यता असते. कुशवाहा सांगतात की, त्यांच्या करिअर, आर्थिक आणि नात्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. जेव्हा तुम्ही अंगठ्याने टिळा वरच्या दिशने लावता तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात अग्नी तत्त्वाचा नकारात्मक परिणाम होतो.
अंगठ्याने टिळा कधी करावा?
मयंक कुशवाहा यांनी अंगठ्याने टिळा कधी करावे याबद्दलही माहिती दिली आहे. ते सांगतात की, पूर्वीच्या काळात जेव्हा राजे महाराजे युद्धासाठी घराबाहेर पडायचे तेव्हा राणी त्यांना अंगठ्याने टिळा लावून विजयाची कामना करायची. कुशवाहा सांगतात की, जेव्हा तुम्हाला कोर्ट कचेरी, एखाद्या विजयाशी संबंध कामासाठी घराबाहेर पडायचं असेल तर अशावेळी अंगठ्याने टिळा लावा. अंगठ्याने टिळा हा यशाचे प्रतिक मानले जाते.
भावाला कोणत्या बोटाने टिळा लावाला?
जर भावाला अंगठ्याने टिळा करायचा नाही, तर मग कोणत्या बोटाने टिळा लावला पाहिजे, हे प्रत्येक महिलेला माहिती असायला पाहिजे. मयंक कुशवाहा सांगतात की, आपल्या प्रियजनांचे औक्षण करताना अनामिक म्हणजे तिसऱ्या बोटाने टिळा लावा. यामुळे भावाचा आयुष्यात आनंद, यश प्राप्त होतो. अनामिकाने टिळा लावणे हे धार्मिक शास्त्रात पवित्र मानले जातं.
राखी बांधण्याची पद्धत काय?
बहिणीला राखी बांधताना नेहमी अनामिकने टिळा करा. यानंतर, अक्षता तर्जनी आणि अंगठ्याने भावाच्या कपाळावर लावा. तुमच्या भावाच्या राखीत तीन गाठी बांधा. असे मानले जाते की या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. आता तुमच्या भावाची आरती करा. नंतर तुमच्या भावाच्या उजव्या हाताला राखी बांधा. यानंतर, तुमच्या भावाला त्याचे आवडते गोड खायला द्या. शेवटी भावांनी बहिणींकडून आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना काही भेटवस्तू द्याव्यात. एक लक्षात ठेवा टिळा लावल्यानंतर अक्षता नेहमी लावा त्याशिवाय औक्षण अपूर्ण मानले जाते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
[ad_3]
Source link