Ganesh Chaturthi 2025 : श्रावणाला सुरुवात झाली की सणाला सुरुवात होते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णाजन्माष्टमी आणि त्यानंतर येतो तो गणेशोत्सवाचा सण…महाराष्ट्रासह अख्खा देश गणेशाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. भक्त बाप्पाच्या स्वागतासाठी त्याच्या आदरतिथ्यासाठी मोठ्या जोऱ्यात तयारी करत आहेत. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे, बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ काय? पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या अन्यथा वेळेवर धावपळ होईल.
गणेश चतुर्थी तिथी 2025
मराठी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे.
गणेश चतुर्थी पूजेसाठी शुभ मुहूर्त 2025
स्थापनेचा मुहूर्त: सकाळी 11:23 ते दुपारी 01:54 (अवधिः 2 तास 31 मिनिटे)
गणेश चतुर्थी पंचांग 2025
सूर्योदय पहाटे 05:57 वा.
सूर्यास्त संध्याकाळी 06:48 वा.
चंद्रोदय सकाळी 09:28 वा.
चंद मावळतो रात्री 08:56 वा.
ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:28 ते 05:12 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त दुपारी 02:31 ते 03:22 वाजेपर्यंत
संधिप्रकाशाची वेळ संध्याकाळी 06:48 ते 07:10 वाजेपर्यंत
निशिता मुहूर्त दुपारी 12 ते 12:45 वाजेपर्यंत
गणपती प्रतिष्ठापना पूजेचं साहित्य
– गणपती मूर्ती
– हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, अक्षता
– 10 सुपार्या, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड
– रेशीम कापड, कापसाची वस्त्रे, 2 जानवी जोड, 1 पंचा,
– तांदूळ, तुळस, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळे
– 2 नारळ, 5 फळे, 25 विड्याची पाने
– कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध,
– कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुटे पैसे.
– चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.
– हात पुसण्यासाठी फडके, देवाचे अंग पुसण्यासाठी कापड
– कापसाची वात, चार लहान वाट्या, चंदन, दूर्वा.
लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा कशी करणार?
तर आपल्या लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कुठले पूजेचे साहित्य हवे आहेत, ते सांगणार आहोत. त्याशिवाय आम्ही दिलेल्या व्हिडीओद्वारे तुम्ही लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करु शकता. तुम्ही घरच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करू शकतात आणि आपल्यासाठी पूजेच्या साहित्यापासून मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
गुरुजीशिवाय करु शकता गणपतीची विधीवत पूजा!
या व्हिडीओमध्ये गुरुजी तुम्हाला गणपतीची विधीवत पूजा-अर्चा सांगणार आहेत.
तेव्हा गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करताना हा व्हिडीओ लावल्यास तुम्ही अगदी भक्तीभावाने पूजा करु शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Ganesh Chaturthi 2025 : श्रावणाला सुरुवात झाली की सणाला सुरुवात होते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णाजन्माष्टमी आणि त्यानंतर येतो तो गणेशोत्सवाचा सण...महाराष्ट्रासह अख्खा देश गणेशाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. भक्त बाप्पाच्या स्वागतासाठी त्याच्या आदरतिथ्यासाठी मोठ्या जोऱ्यात तयारी करत आहेत. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे, बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ काय? पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या अन्यथा वेळेवर धावपळ होईल.
गणेश चतुर्थी तिथी 2025
मराठी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे.
गणेश चतुर्थी पूजेसाठी शुभ मुहूर्त 2025
स्थापनेचा मुहूर्त: सकाळी 11:23 ते दुपारी 01:54 (अवधिः 2 तास 31 मिनिटे)
गणेश चतुर्थी पंचांग 2025
सूर्योदय पहाटे 05:57 वा.
सूर्यास्त संध्याकाळी 06:48 वा.
चंद्रोदय सकाळी 09:28 वा.
चंद मावळतो रात्री 08:56 वा.
ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:28 ते 05:12 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त दुपारी 02:31 ते 03:22 वाजेपर्यंत
संधिप्रकाशाची वेळ संध्याकाळी 06:48 ते 07:10 वाजेपर्यंत
निशिता मुहूर्त दुपारी 12 ते 12:45 वाजेपर्यंत
गणपती प्रतिष्ठापना पूजेचं साहित्य
– गणपती मूर्ती
– हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, अक्षता
– 10 सुपार्या, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड
– रेशीम कापड, कापसाची वस्त्रे, 2 जानवी जोड, 1 पंचा,
– तांदूळ, तुळस, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळे
– 2 नारळ, 5 फळे, 25 विड्याची पाने
– कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध,
– कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुटे पैसे.
– चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.
– हात पुसण्यासाठी फडके, देवाचे अंग पुसण्यासाठी कापड
– कापसाची वात, चार लहान वाट्या, चंदन, दूर्वा.
लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा कशी करणार?
तर आपल्या लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कुठले पूजेचे साहित्य हवे आहेत, ते सांगणार आहोत. त्याशिवाय आम्ही दिलेल्या व्हिडीओद्वारे तुम्ही लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करु शकता. तुम्ही घरच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करू शकतात आणि आपल्यासाठी पूजेच्या साहित्यापासून मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
गुरुजीशिवाय करु शकता गणपतीची विधीवत पूजा!
या व्हिडीओमध्ये गुरुजी तुम्हाला गणपतीची विधीवत पूजा-अर्चा सांगणार आहेत.
तेव्हा गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करताना हा व्हिडीओ लावल्यास तुम्ही अगदी भक्तीभावाने पूजा करु शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
[ad_3]
Source link