‘हे’ मंदिर रात्रभर भूतांनी बांधले! भोलेनाथच्या भक्तांची प्रत्येक इच्छा होते पूर्ण अशी मान्यता

श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे. या महिन्यात महादेवाची मोठ्या भक्तीभावान पूजा अर्चा करतात. भारतात महादेवाचे असंख्य मंदिर आहे. पण तुम्हाला महादेवाचं असं एक मंदिर माहिती आहे जे एका रात्रीत भूतांने उभारलं आहे. या मंदिराबद्दल आणि त्याचा पौराणिक कथेबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. या मंदिराबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. हे मंदिर आहे, कानपूरमध्ये भोलेनाथचे भूतेश्वर मंदिर. बाबा भूतेश्वर प्रत्येक इच्छा पूर्ण करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच संपूर्ण श्रावण महिन्यात दूरदूरहून भाविक बाबांच्या दर्शनासाठी इथे येतात. एवढंच नाही तर हे मंदिर भगवान श्री रामांच्या काळाशी संबंधित आहे. असेही मानले जाते की हे मंदिर भूतांनी बांधले होते. (This temple was built by ghosts overnight kanpur bhooteshwar mandir Information in marathi)

हजारो वर्षे जुने मंदिर 

हसनपूर परिसरात भगवान शिवाचे एक हजार वर्षे जुने मंदिर असून अशी आख्यायिका आहे की भगवान शिवाच्या आवडत्या भूतांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले. त्यामुळे त्याचे नाव भूतेश्वर महादेव पडले. मंदिराचे महंत महाराज गिरी यांनी सांगितलं की हे मंदिर हजारो वर्षे जुने आहे. जेव्हा भगवान राम यांनी सीता मातेचा त्याग केला तेव्हा सीता माता लव आणि कुशसह बिठूरमध्ये राहत होती. त्यानंतर ती दररोज जलपूजेसाठी येत असे.

असं म्हटलं जातं की मुघल शासक औरंगजेबाने या मंदिराची तोडफोड केली होती. जरी याबद्दल कोणीही स्पष्ट नाही, पण पूर्वजांनी दिलेल्या माहितीनुसार, भूतेश्वर महादेव मंदिरात अजूनही तुटलेल्या मूर्तींचे अवशेष आहेत. त्या पाहून हे स्पष्ट होते की, मुघल शासक औरंगजेबाने या मंदिरावर हल्ला केला होता.

भूतेश्वर महादेव मंदिरात दोन बोगदे होते. त्यापैकी एक रावतपूर परिसरात आणि दुसरा बिठूर परिसरात उघडला जात असे. रावतपूरच्या राजाची राणी रौतला या बोगद्यांमधून भूतेश्वर महादेवाची पूजा करण्यासाठी येत असे. राणी रौतला खूप सुंदर होती. कोणीही तिला पाहू नये म्हणून, रावतपूरच्या राजाने राणीसाठी दोन बोगदे बांधले होते. ज्याचे अवशेष आजही आहेत.

या भागातील लोकांची भूतेश्वर महादेवावर अपार आणि अढळ श्रद्धा आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, भूतेश्वर बाबा कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत. सर्व भक्त बाबांवर प्रसन्न होऊन परत जातात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर पितळी घंटा अर्पण करतात. भूतेश्वर महादेव मंदिरात दररोज सकाळी 5 वाजता महादेवाची आरती केली जाते. शेकडो भाविक त्यात सहभागी होतात. श्रावण महिन्यात भक्तांची संख्या आणखी वाढते आणि सर्वजण बाबांची पूजा करण्यासाठी रांगेत उभे असलेले दिसतात.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24