Deep Amavasya 2025 : आज दीप अमावस्या; कशी करायची दिव्यांची पूजा? कणकेच्या गोड दिवा नक्की लावा

Deep Amavasya 2025 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व असून श्रावणमास सुरु होण्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला खास महत्त्व आहे. ही अमावस्या महाराष्ट्रात आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2024) आणि दीप अमावस्या ( Deep Amavasya 2024) नावाने साजरी करण्यात येते. उत्तर प्रदेशात हरियाली अमावस्या ( Hariyali Amavasya 2024), कर्नाटकात भीमाना अमावस्या (Bhimana Amavasya 2024) तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते. (Deep Amavasya How to worship the lamps Make sure to light the sweet lamp made of dough in marathi)

दीप अमावस्येचा 2025 शुभ मुहूर्त 

प्रारंभ तिथी : 24 जुलै 2025, गुरुवार, सकाळी 7:28 वाजता

समाप्ती तिथी: 25 जुलै 2025, शुक्रवार, सकाळी 9:17 वाजता

अमृत काळ: 24 जुलै 2025, दुपारी 1:30 वाजेपासून ते दुपारी 3:00 वाजेदरम्यान असेल.

अशी करा दिव्यांची पूजा!

दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करुन त्यांची पूजा करा. यादिवशी कणकेच्या गोड दिव्यांनी घरातील दिव्यांची पूजा करावीत. दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो. म्हणजे तो नकारात्मक उर्जेतून सकारात्मक उर्जेकडे नेतो. त्यामुळे हिंदू धर्मात दिव्याला अतिशय महत्त्व असून त्याला मांगल्य आणि शुभ कार्याचं प्रतिक मानले गेले आहे. 

दीप अमावस्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ करुन देवासमोर पाट किंवा चौरंगावर त्यांची मांडणी करा. चौरंगासोर सुरेख रांगोळी काढा. दिव्याची हळदीकुंकू आणि फुलं अर्पण करुन पूजा करा. यादिवशी 5, 7 किंवा 11 कणकेच्या दिव्यांनी पूजा करावीत. त्यानंतर, देवाला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर ‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥’, या मंत्राचा जप करा. या मंत्रा अर्थ असा आहे की,  हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा आहे. 

कणकेचे गोड दिवे कसे बनवावे?

साहित्य 

गव्हाचे पीठ एक कप

रवा दोन टेबलस्पून

अर्धी वाटी गूळ

चवीपुरतं मीठ आणि तेल

कृती 

कढईत पाणी गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये आपण घेतलेल्या प्रमाणात गुळ घाला. पाण्यात गूळ पुर्णपणे वितळवून थंड झाल्यानंतर त्यात दोन कप गव्हाचे पीठ, दोन चमचे रवा मिक्स करा. मीठ आणि दोन चमचे तेल घाला. लागेल तसे पाणी वापरून हे घट्ट पीठ मळून घ्या. त्यानंतर झाकून पंधरा मिनिटं ठेवा. आता या तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याला दिव्यांचा आकार द्या. आता हे दिवे वाफेवर उकडून घ्या. 10 मिनिट गरम वाफेवर ठेवल्याने दिवे पटकन उकडले जातात. त्यानंतर दिव्यांमध्ये तूप आणि वाती घालून हे दिवे प्रज्वलित करा. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 
Deep Amavasya 2025 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व असून श्रावणमास सुरु होण्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला खास महत्त्व आहे. ही अमावस्या महाराष्ट्रात आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2024) आणि दीप अमावस्या ( Deep Amavasya 2024) नावाने साजरी करण्यात येते. उत्तर प्रदेशात हरियाली अमावस्या ( Hariyali Amavasya 2024), कर्नाटकात भीमाना अमावस्या (Bhimana Amavasya 2024) तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते. (Deep Amavasya How to worship the lamps Make sure to light the sweet lamp made of dough in marathi)

दीप अमावस्येचा 2025 शुभ मुहूर्त 

प्रारंभ तिथी : 24 जुलै 2025, गुरुवार, सकाळी 7:28 वाजता

समाप्ती तिथी: 25 जुलै 2025, शुक्रवार, सकाळी 9:17 वाजता

अमृत काळ: 24 जुलै 2025, दुपारी 1:30 वाजेपासून ते दुपारी 3:00 वाजेदरम्यान असेल.

अशी करा दिव्यांची पूजा!

दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करुन त्यांची पूजा करा. यादिवशी कणकेच्या गोड दिव्यांनी घरातील दिव्यांची पूजा करावीत. दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो. म्हणजे तो नकारात्मक उर्जेतून सकारात्मक उर्जेकडे नेतो. त्यामुळे हिंदू धर्मात दिव्याला अतिशय महत्त्व असून त्याला मांगल्य आणि शुभ कार्याचं प्रतिक मानले गेले आहे. 

दीप अमावस्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ करुन देवासमोर पाट किंवा चौरंगावर त्यांची मांडणी करा. चौरंगासोर सुरेख रांगोळी काढा. दिव्याची हळदीकुंकू आणि फुलं अर्पण करुन पूजा करा. यादिवशी 5, 7 किंवा 11 कणकेच्या दिव्यांनी पूजा करावीत. त्यानंतर, देवाला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करा. या मंत्रा अर्थ असा आहे की,  हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा आहे. 

कणकेचे गोड दिवे कसे बनवावे?

साहित्य 

गव्हाचे पीठ एक कप

रवा दोन टेबलस्पून

अर्धी वाटी गूळ

चवीपुरतं मीठ आणि तेल

कृती 

कढईत पाणी गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये आपण घेतलेल्या प्रमाणात गुळ घाला. पाण्यात गूळ पुर्णपणे वितळवून थंड झाल्यानंतर त्यात दोन कप गव्हाचे पीठ, दोन चमचे रवा मिक्स करा. मीठ आणि दोन चमचे तेल घाला. लागेल तसे पाणी वापरून हे घट्ट पीठ मळून घ्या. त्यानंतर झाकून पंधरा मिनिटं ठेवा. आता या तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याला दिव्यांचा आकार द्या. आता हे दिवे वाफेवर उकडून घ्या. 10 मिनिट गरम वाफेवर ठेवल्याने दिवे पटकन उकडले जातात. त्यानंतर दिव्यांमध्ये तूप आणि वाती घालून हे दिवे प्रज्वलित करा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 
[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24