Deep Amavasya 2025 : महाराष्ट्रात आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्येला घरातील लहान मुलांना ओवाळण्याची परंपरा आहे. आषाढी अमावस्येनंतर श्रावणमासाला सुरुवात होते. हिंदू धर्मानुसार आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. या दिव्यांची कणिकेच्या दिव्यांनी औक्षण करण्यात येते. यादिवशी धर्मशास्त्रात दिव्यांशिवाय घरातील लहान मुलांचंही औक्षण करण्यात येतं. यामागे श्रीकृष्णाशी संबंधित एक कथा आहे. या आहे ही परंपरा आणि कसं करायचं लहान मुलांचं औक्षण जाणून घ्या. (Why do children pray for our children on Deep Amavasya This special lamp should be waved in marathi )
दीप अमावस्येला लहान मुलांचं औक्षण का करतात?
प्रकाश हे सकारात्मक उर्जेचं प्रतिक आहे. प्रकाशामुळे आयुष्यातील अंध:कार नाहीसा होतो. त्यामुळे धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की, दीप अमावस्येला घरातील लहान मुलांचं औक्षण केल्यास त्यांच्या आयुष्यातील संकट दूर होऊ, त्यांच्या आयुष्यात कायम प्रकाश राहा. नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावं यासाठी घरातील महिला मुलांचं औक्षण करते.
श्रीकृष्णाची दिव्यांनी औक्षण का करण्यात आले?
यामागे अशी आख्यायिका आहे की, यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी, गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केलं होतं. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली होती. असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णाला ओवळताना केली होती. तेव्हापासून सुरु झालेली ही परंपरा आजही पाळली जाते. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आरास केली जाते.
कोणत्या दिव्याने मुलांचं औक्षण करावे?
दीप अमावस्या घरातील लहान मुलांना ओवाळताना कणिकेच्या दिव्याने त्यांचं औक्षण करण्यात यावे. दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांना अतिशय महत्त्व आहे. या कणकेच्या दिव्यांना दुसऱ्या दिवशी पाण्यात अर्पण करावे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Deep Amavasya 2025 : महाराष्ट्रात आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्येला घरातील लहान मुलांना ओवाळण्याची परंपरा आहे. आषाढी अमावस्येनंतर श्रावणमासाला सुरुवात होते. हिंदू धर्मानुसार आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. या दिव्यांची कणिकेच्या दिव्यांनी औक्षण करण्यात येते. यादिवशी धर्मशास्त्रात दिव्यांशिवाय घरातील लहान मुलांचंही औक्षण करण्यात येतं. यामागे श्रीकृष्णाशी संबंधित एक कथा आहे. या आहे ही परंपरा आणि कसं करायचं लहान मुलांचं औक्षण जाणून घ्या. (Why do children pray for our children on Deep Amavasya This special lamp should be waved in marathi )
दीप अमावस्येला लहान मुलांचं औक्षण का करतात?
प्रकाश हे सकारात्मक उर्जेचं प्रतिक आहे. प्रकाशामुळे आयुष्यातील अंध:कार नाहीसा होतो. त्यामुळे धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की, दीप अमावस्येला घरातील लहान मुलांचं औक्षण केल्यास त्यांच्या आयुष्यातील संकट दूर होऊ, त्यांच्या आयुष्यात कायम प्रकाश राहा. नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावं यासाठी घरातील महिला मुलांचं औक्षण करते.
श्रीकृष्णाची दिव्यांनी औक्षण का करण्यात आले?
यामागे अशी आख्यायिका आहे की, यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी, गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केलं होतं. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली होती. असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णाला ओवळताना केली होती. तेव्हापासून सुरु झालेली ही परंपरा आजही पाळली जाते. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आरास केली जाते.
कोणत्या दिव्याने मुलांचं औक्षण करावे?
दीप अमावस्या घरातील लहान मुलांना ओवाळताना कणिकेच्या दिव्याने त्यांचं औक्षण करण्यात यावे. दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांना अतिशय महत्त्व आहे. या कणकेच्या दिव्यांना दुसऱ्या दिवशी पाण्यात अर्पण करावे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
[ad_3]
Source link