Nag Panchami 2025 : श्रावण महिना सुरु झाल्यानंतर पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी करण्यात येते. भारतीय संस्कृतीतील सण हे मानव आणि सृष्टीचं नातं दृढय करण्याचे एक माध्यम आहे. त्यासोबत धार्मिकशास्त्रात प्रत्येक सणामागे एक कथा सांगण्यात आली आहे. श्रावणात नागपंचमी साजरी करण्यामागे काय कथा आहे. शिवाय विषारी आणि जीवघेण्या सापाची आपण का पूजा करतो, त्याबद्दल जाणून घेऊयात. सर्प हा महादेवाचा श्रृंगारातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात श्रावण हा महिना महादेवाचा प्रिय महिना आहे.
वैदिक शास्त्रानुसार नागपंचमीला सर्प देवतेची पूजा केल्याने जीवनातील दु:ख दूर होतात आणि आर्थिक अडचणीवर मात करता येते असं मानलं जातं.
नागपंचमी कधी आहे?
मराठी पंचांगानुसार श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 28 जुलै 2025 रात्री 11.25 वाजेपासून 29 जुलै 2025 दुपारी 12.47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 29 जुलै 2025 ला नागपंचमीचा सण साजरा करायचा आहे.
नागपंचमीला कोणते शुभ योग?
यंदा नागपंचमीला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2 अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. यादिवशी सौभाग्य योगासह शिव योग असणार आहे.
नागपंचमी पूजा शुभ मुहूर्त?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक काम हे शुभ मुहूर्तावर करणे फलदायी मानले जाते. नागपंचमीच्या पूजेसाठी 29 जुलै 2025 ला शुभ मुहूर्त पहाटे 5.41 वाजेपासून सकाळी 8.23 वाजेपर्यंत असणार आहे.
नागपंचमी पूजा विधी
नागपंचमीला मंदिराजवळ चौरंग किंवा पाट किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढा. काही ठिकाणी मातीच्या नागाची पूजा केली जाते. आता दुर्वा, दही, गंध, अक्षता, फुलं अर्पण करुन त्याची मनोभावे पूजा करा. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करा. त्यासोबतच कालसर्पदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!’ ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! या मंत्राचा जप करावा, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरु किंवा कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये. तसंच कोणाची हिंसा करुन नये आणि जमीन खणू नये.
नागपंचमीला कोणत्या नागांची पूजा केली जाते?
नागपंचमीला आठ नागांची वासुकी, ऐरावता, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र या नागांची पूजा करण्यात येते.
नागपंचमी कथा!
पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप आणि कद्रु यांचं पुत्र होते यातील अष्टनाग – अनंत, वासुकी, पद्म, महापद्य, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक (कालिया) ते प्रजेला त्रास देऊ लागले. म्हणून ब्रम्हदेवाने त्यांना शाप दिला की, तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून (गरूडाकडून) मारले जाल. जनमेजयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत, वासुकी हे मानवाला अनुकूल आणि तक्षक, कर्कोटक, कालीय हे देव – मानवांचे कट्टर वैरी, या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते. कृतज्ञतेपोटी उपकारांची आणि भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात.
यमुनेत्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं. तो दिवस म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे नागपंचमी म्हणून साजरी करण्यात येते.
नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते?
आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं. तसं पाहिलं तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी, पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे. नागाला वनात राहणेच आवडते, त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो.
नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात. उंदीर, घुस इ. शेतात येऊ देत नाही. हे सुद्धा त्यांचं एक उपकारच आहे. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पहावयास आपली संस्कृती सांगत आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Nag Panchami 2025 : श्रावण महिना सुरु झाल्यानंतर पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी करण्यात येते. भारतीय संस्कृतीतील सण हे मानव आणि सृष्टीचं नातं दृढय करण्याचे एक माध्यम आहे. त्यासोबत धार्मिकशास्त्रात प्रत्येक सणामागे एक कथा सांगण्यात आली आहे. श्रावणात नागपंचमी साजरी करण्यामागे काय कथा आहे. शिवाय विषारी आणि जीवघेण्या सापाची आपण का पूजा करतो, त्याबद्दल जाणून घेऊयात. सर्प हा महादेवाचा श्रृंगारातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात श्रावण हा महिना महादेवाचा प्रिय महिना आहे.
वैदिक शास्त्रानुसार नागपंचमीला सर्प देवतेची पूजा केल्याने जीवनातील दु:ख दूर होतात आणि आर्थिक अडचणीवर मात करता येते असं मानलं जातं.
नागपंचमी कधी आहे?
मराठी पंचांगानुसार श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 28 जुलै 2025 रात्री 11.25 वाजेपासून 29 जुलै 2025 दुपारी 12.47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 29 जुलै 2025 ला नागपंचमीचा सण साजरा करायचा आहे.
नागपंचमीला कोणते शुभ योग?
यंदा नागपंचमीला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2 अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. यादिवशी सौभाग्य योगासह शिव योग असणार आहे.
नागपंचमी पूजा शुभ मुहूर्त?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक काम हे शुभ मुहूर्तावर करणे फलदायी मानले जाते. नागपंचमीच्या पूजेसाठी 29 जुलै 2025 ला शुभ मुहूर्त पहाटे 5.41 वाजेपासून सकाळी 8.23 वाजेपर्यंत असणार आहे.
नागपंचमी पूजा विधी
नागपंचमीला मंदिराजवळ चौरंग किंवा पाट किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढा. काही ठिकाणी मातीच्या नागाची पूजा केली जाते. आता दुर्वा, दही, गंध, अक्षता, फुलं अर्पण करुन त्याची मनोभावे पूजा करा. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करा. त्यासोबतच कालसर्पदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी 'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! या मंत्राचा जप करावा, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरु किंवा कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये. तसंच कोणाची हिंसा करुन नये आणि जमीन खणू नये.
नागपंचमीला कोणत्या नागांची पूजा केली जाते?
नागपंचमीला आठ नागांची वासुकी, ऐरावता, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र या नागांची पूजा करण्यात येते.
नागपंचमी कथा!
पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप आणि कद्रु यांचं पुत्र होते यातील अष्टनाग - अनंत, वासुकी, पद्म, महापद्य, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक (कालिया) ते प्रजेला त्रास देऊ लागले. म्हणून ब्रम्हदेवाने त्यांना शाप दिला की, तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून (गरूडाकडून) मारले जाल. जनमेजयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत, वासुकी हे मानवाला अनुकूल आणि तक्षक, कर्कोटक, कालीय हे देव - मानवांचे कट्टर वैरी, या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते. कृतज्ञतेपोटी उपकारांची आणि भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात.
यमुनेत्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं. तो दिवस म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे नागपंचमी म्हणून साजरी करण्यात येते.
नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते?
आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं. तसं पाहिलं तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी, पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे. नागाला वनात राहणेच आवडते, त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो.
नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात. उंदीर, घुस इ. शेतात येऊ देत नाही. हे सुद्धा त्यांचं एक उपकारच आहे. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पहावयास आपली संस्कृती सांगत आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
[ad_3]
Source link