Nag Panchami 2025 : नागपंचमीचा सण मंगळवारी 29 जुलै 2025 ला साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे काही नियम असतात. घराघरात नागपंचमीला चिरणे, तळणे, भाजणे यासारख्या गोष्टी करायचा नाही, असे घरातील मोठी मंडळी सांगत असणार. पण तुम्हाला यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण माहिती आहे का? नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्यात येते. घराघरामध्ये नागदेवतेची मातीची मूर्ती किंवा चित्र काढून पूजा करण्यात येते. धार्मिक परंपरेनुसार, तवा किंवा कढई वापरून अन्न शिजवणे, म्हणजे नागाच्या फण्याला इजा पोहोचवण्यासारखे असं मानले गेले आहे. त्यामुळे यादिवशी तवा आणि कढई वापरली जात नाही. तर नागपंचमीला नैवेद्यासाठी उकडीचे पदार्थ, खीर, किंवा इतर उकडलेले पदार्थ बनवले जातात, यामागेही विशेष कारण आहे. (reason behind eating only boiled food know the reason behind non chopping non frying food making on nagpanchami 2025 )
नागपंचमी हा सण नागांची पूजा करण्यासाठी समर्पित असून यादिवसी नागांना त्रास होईल किंवा त्यांची अवहेलना होईल अशी कामं करुन नयेत असं सांगितलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी काहीही चिरणे, कापणे, भाजणे किंवा तळणे म्हणजे नागांना इजा पोहोचवण्यासारखे मानले गेले आहे.
ब्रह्मपुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिलं होतं. या दिवशी नागाची पूजा केल्याने राहू-केतू जन्म दोष आणि कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. म्हणूनच या दिवशी इतर काही काम करण्यास मनाई आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही कामासाठी जमीन खणू नका. या दिवशी शिवणकाम, भरतकाम करू नये, कारण नागपंचमीला चाकू, सुई या धारदार आणि टोकदार गोष्टींचा वापर अशुभ मानल्या गेल्या आहेत.
तरदुसरीकडे हिंदू धर्मात काही पौराणिक कथा आहेत त्यापैकीच एक अशी आहे की, एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली आणि त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा प्रचलित आली.
वैज्ञानिक दृष्ट्या काय?
नागपंचमी हा सण ऐन पावसाळ्यात येत असल्याने नाग किंवा सापाच्या बिळात पाणी जातं त्यामुळं ते शेतात अडोसा शोधतात. त्यांची विश्रांतीस्थाने असतात. साप आणि नागांची विश्रांतीस्थाने आपल्याकडून नष्ट होऊ नये किंवा त्यांना इजा होऊ नये यासाठी खणू नये किंवा कोयता चालवू नये असं म्हटलं जातं. शेतीची कामेदेखील या दिवशी टाळली जातात.
पावसाळ्यात हा सण आल्याने या काळात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळं शक्यतो हलका आहार घेतला जातो. भाजलेले व तळलेल्या पदार्थांमुळं पचनशक्ती खराब होऊ शकते. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी उकडलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडलेले अन्न खाल्ल्याने पचनशक्तीदेखील सुधारते.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
[ad_3]
Source link