Shravan 2025: हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण तो भगवान शंकरांचा प्रिय महिना आहे. या महिन्यात भक्त महादेवाची विशेष पूजा, उपवास आणि जलाभिषेक करतात. पण या काळात विवाह म्हणजेच लग्न करण्यास मनाई असते. यामागे धार्मिक आणि पारंपरिक कारणे आहेत. जाणून घेऊयात सविस्तर
हिंदू धर्मात श्रावण महिन्यात भक्तगण मोठ्या श्रद्धेने महादेवाची पूजा, व्रत आणि त्यांच्याकडे समृद्धी, सुख-शांतीची प्रार्थना करतात. असं म्हटलं जाते की या महिन्यात शिवशंकर आपल्यावर प्रसन्न झाले तर ते आपली मनोकामना पूर्ण करतात. या महिन्यामध्ये तरुण मुली चांगली नवरा मिळावा म्हणून महादेवाची पूजा करतात. तर विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी माता पार्वती आणि महादेव यांची आराधना करतात.
श्रावण महिन्यात लग्न का होत नाहीत?
यामागे धार्मिक कारण आहे. श्रावण महिना चातुर्मास या पवित्र कालखंडात येतो. या दरम्यान भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत म्हणजे गाढ ध्यानावस्थेत जातात. हिंदू धर्मात मान्यता आहे की, विवाहासारखे मंगल कार्य विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत असतात तेव्हा संपूर्ण चातुर्मासात म्हणजेच श्रावण महिन्यात विवाह, वास्तुशांती, गृहप्रवेश यासारखी कार्यक्रम करता येत नाहीत.
जेव्हा भगवान विष्णू ध्यानात असतात. तेव्हा धरतीच्या संचालनाची जबाबदारी ही त्यांच्यावर असते. अशावेळी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. मात्र, ते स्वत: विवाह कार्यांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यामुळे श्रावण महिन्यात विवाह करणे शुभ मानले जात नाही.
श्रावण महिन्याची सुरुवात कधी?
श्रावण महिन्यात लग्न होत नाहीत. या महिन्यात सर्व महादेव भक्त व्रत, जलाभिषेक, महादेवाच्या आराधनेत व्यस्त असतात. ते आपल्या जीवनात शांती, समाधान आणि समृद्धीची कामना करतात. या वर्षी 2025 मध्ये श्रावण महिना 11 जुलैपासून सुरू होणार आहे. या दिवशी शिववास योग सुरु होत असून हा विशेष शुभ योग मानला जातो. या योगात भगवान शंकर माता पार्वतींसह कैलास पर्वतावर विराजमान असतात. या दिवशी शिवपूजा आणि जलाभिषेक केल्यास भक्ताला सौभाग्य, समृद्धी आणि मनोकामनेची पूर्ती होते.

[ad_3]
Source link