Astro Tips : ज्योतिषशास्त्र असो किंवा वास्तूशास्त्र यात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबद्दल नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमाचा पालन केल्यास आपल्या आयुष्यातील अनेक अडचणीवर आपण मात करु शकतो असं ते सांगतात. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. सोमवार हा महादेवाची आराधना करण्याचा दिवस असतो. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, प्रत्येक कामासाठी एक योग्य वेळ असते. ज्याप्रमाणे आपण शुभ कामासाठी शुभ दिवस आणि मुहूर्त पाहतो. तसंच दैनंदिन जीवनातील कामासाठीही शुभ आणि अशुभ दिवस सांगण्यात आले आहेत. आज आपण आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे हे शुभ आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत.
शक्यतो आपण सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी केस कापण्याचा कार्यक्रम ठेवतो. पण धार्मिक शास्त्रानुसार आठवड्यातील चुकीच्या दिवशी तुम्ही केस कापल्यास त्याचा अशुभ परिणाम तुमच्यावर होतो. तर योग्य दिवशी म्हणजेच शुभ दिवशी केस कापल्यास तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर धार्मिकशास्त्र काय सांगत पाहूयात.
कोणत्या दिवस केस कापण्यासाठी शुभ आणि कोणता अशुभ?
धार्मिक मान्यतेनुसार, अनेकंना रविवारच्या दिवशी केस कापण्याची सवय असते, त्याचं मुख्य कारण म्हणजे या दिवशी अनेकांना सुट्टी असते. पण ज्योतिशास्त्रानुसार रविवारच्या दिवशी केस कापणे अशुभ मानले गेले आहे. रविवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खराब होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होतात.सोमवारचा दिवस चंद्राशी संबंधित असल्याने या दिवशी केस कापणे अशुभ मानले गेले आहे. जर तुम्ही सोमवारी केस कापल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील आणि घरामध्ये आर्थिक चणचण भासू शकते, असं मानलं जातं. तर मंगळवाच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चुकीच्या घटना घडतील असं सांगितलं गेलं आहे. त्यासोबतच रक्तासंबंधित आजार होण्याची शक्यता शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
तर बुधवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला गेला आहे. बुधवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. हिंदू धर्मामध्ये गुरूवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतो असं सांगण्यात आले आहे. त्यासोबतच या दिवशी काही विशेष पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत मिळते. गुरूवारी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील अडथळे दूर होतात. शुक्रवारी केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. शुक्रवारी केस कापल्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होते. त्यासोबतच तुम्हाला आर्थिक लाभ होतो. शनिवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमची सामाजिक आणि आर्थिक प्रगती होते. तुमच्यावर शनिदेवची कृपादृष्टी राहाते आणि तुमच्या कडे पैसाच पैसा येतो, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

[ad_3]
Source link