Ashadhi Ekadashi 2025: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर; वाचा सविस्तर


Ashadhi Ekadashi Palkhi Sohala 2025 Time Table: संपूर्ण महाराष्ट्राला दरवर्षी वेध लागते अशा पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. देहूतून 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल. तर आळंदीतून 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन्ही संस्थानकडून पालख्यांचे वेळापत्रक घोषित करण्यात आलं आहे. 

पालखीच्या मार्गक्रमणाचं सविस्तर वेळापत्रक

श्री क्षेत्र आळंदी ते श्री श्रेत्र पंढरपूरदरम्यानचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची आषाढीवारीची पालखी 19 जून रोजी सकाळी आठ वाजता प्रस्थान करेल. पहिल्या दिवसाचा मुक्काम आंळदी संस्थानच्या दर्शन मंडप इमारतीमध्ये असेल. 20 जून रोजी आळंदी ते पुण्यातील भवानीपेठ दरम्यान पालखी प्रवास करुन दुसरा मुक्काम करेल. 21 तारखेला पालखी पुण्यात मुक्कामी असेल. 22 जून रोजी पुण्यावरुन निघालेली पालखी शिंदे छत्री-आरतीसाठी विसावा घेईल. हडपसरला दुपारची विश्रांती घेऊन पालखी रात्री सासवडला मुक्कामी असेल. 23 जून रोजी पालखी सासवड मुक्कीम असणार आहे. 24 जून रोजी पालखी सासवड ते जेजुरी असा प्रवास पूर्ण करणार आहे. 25 जूनला पालखी जेजुरी ते वाल्हे हा टप्पा पार करणार आहे. 

कुठे कुठे असणार पालखीचा मुक्काम?

26 जूनला वाल्हे ते लोणंद, 27 जूनला लोणंदमधून पालखी तरडगाव येथे मुक्कामी जाईल. 28 जूनला तरडगाव ते पलटण असा प्रवास पूर्ण करुन पुढच्या दिवशी म्हणजेच 29 जून रोजी पालखी फलटणहून बरडाला पोहोचणार आहे. 30 जूनचा मुक्काम नातेपुतेला असेल. तर 1 जुलै रोजी पालखी माळशिरसला मुक्कामी असणार आहे. 

पंढरपुरमध्ये पोहचल्यानंतर नियोजन कसं?

2 जुलै रोजी वेळापूर, 3 जुलै रोजी भंडीशेगाव, 4 जुलै रोजी वाखरी, 5 जुलै रोजी पंढरपूरला पालखी मुक्कामी असेल. रविवारी 6 जुलै रोजी पालखी पंढरपूरला नगरप्रदक्षिणा घालेले. श्रींची पालखी याच दिवशी चंद्रभागेत स्थान करणार आहे. 10 जुलै रोजी पालखी चंद्रभागेमध्ये स्थान करुन श्री विठ्ठल रुक्मिणीची भेट घेईल.

पादुकांजवळ विसावा घेतल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला निघेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24