महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स…
.
पहलगाम हल्ला: रुपाली ठोंबरे सुखरुप परतल्या, अंधारेंना अश्रू अनावर
जम्मू-काश्मीरमध्ये रुपाली ठोंबरे आणि त्यांचे कुटुंबिय पर्यटनासाठी गेले होते. यावेळी पहलगाममध्ये हल्ला झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय तिथेच अडकले. सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आज सकाळी त्या सुखरुप महाराष्ट्रात परतल्या आहेत. त्यांना भेटण्यासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या. आपली मैत्रीण सुखरुप परतली हे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.
पहलगाम हल्ला: संतोष जगदाळेंच्या कुटुंबीयांची शरद पवारांनी घेतली भेट
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. मुलीच्या डोळ्यासमोरच संतोष जगदाळे यांची हत्या करण्यात आली. आज शरद पवार यांनी जगदाळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
पुणे: संतोष जगदाळेंचा मृतदेह घरी आल्यानंतर पत्नीला अश्रू अनावर
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात दाखल झाले. संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटून निघाले होते. मी काश्मीरला फिरायला जातोय, लवकर परत येईल, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र जगदाळे यांचा मृतदेह घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यांच्या पत्नी धाय मोकलून रडत होत्या. सविस्तर वाचा