जम्मू काश्मीर भागात फिरण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या अग्रवाल दांम्पत्याने त्याभागातील परिस्थिती लक्षात घेऊन श्रीनगर मध्येच मुक्कामी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही सुखरुप असल्याच्या संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वा
.
हिंगोली शहरातील शास्त्रीनगर भागातील किराणा व्यापारी शुभम अग्रवाल यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात झाला आहे. मागील तीन दिवसांपुर्वीच ते जम्मू काश्मीरकडे रवाना झाले. त्या परिसरातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देऊन सोमवारी ता. 28 परतीच्या प्रवाशाला निघणार असल्याचे नियोजन त्यांनी केले. त्यानुसार त्यांनी रेल्वे प्रवासाची तिकीटे देखील काढली आहेत,.
दरम्यान, शुमम व त्यांच्या पत्नी रचना अग्रवाल हे दांम्पत्य श्रीनगर येथे पोहोचले. मंगळवारी ता. 22 दुपारी पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंगोलीतील त्यांचे कुटुंबिय चिंतेत सापडले होते. त्यांना शुमम व रचना यांची काळजी लागली होती. पहलगाम हल्याची घटना पाहून अग्रवाल कुटुंबियांचे डोळेही पाणवले होते.
त्यानंतर त्यांनी तातडीने शुभम याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र बराचवेळ त्याच्याशी संपर्क झाला नाही. मात्र रात्रीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर शुभम यांनी दोघेही सुखरुप असून ते श्रीनगर येथेच मुक्कामी थांबल्याचे कुटुंबियांना दुरध्वनीवरून सांगितले. मुलाशी व सुनेसोबत संपर्क झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, आज सकाळीही त्यांनी शुभम याच्याशी संपर्क केला असून त्यांनी पुढील परिस्थिती लक्षात घेऊनच पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर परिस्थिती पाहून ता. 28एप्रिल पुर्वीच परतीचा प्रवास करणार असल्याचे त्यांनी कुटुंबियांना सांगितले असल्याचे शुभम यांचे वडिल कैलास अग्रवाल यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.