पर्यटकांना टार्गेट करत मारले गेले: हल्ला झाला तेव्हा गुप्तचर संस्था काय करत होत्या, विजय वडेट्टीवार यांचा सवाल – Nagpur News



पहलगाममध्ये जर दहशतवादी असा हल्ला करतात तर आपली गुप्तचर यंत्रणा काय करते असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर हजारो पर्यटक तिथे जात असताना सुरक्षेची व्यवस्था का केली गेली नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे.

.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, 4-6 दहशतवादी येतात हल्या करत पर्यटकांना टार्गेट करत मारतात, आणि निघून जातात हे सर्व काही निंदनीय आहे. सरकारने ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवे. यामागे जो कोणी असेल त्याला सोडू नये. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत.यावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ल्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून देशाची एकात्मता खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धर्मांना एकमेकांच्याविरोधात उभे करत भांडण लावण्याचा या सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे, असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.

दोन भाऊ एकत्र आले तर आनंदच

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज- उद्धव एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत. महाविकास आघाडी ही काही 20-25 वर्षांची नाही. दोन पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्या वेळची राजकीय गरज म्हणून मवीआ तयार झाली. राज उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय करायचे ते ठरवू. आधी त्या दोघांचे काय ते ठरू द्या. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे. त्यात आम्ही पडणार नाही.

ज्यांनी हल्ला केला, त्या सर्वांना टिपून टिच्चून काढा- आमदार जितेंद्र आव्हाड

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘सध्या सुट्यांचा हंगाम सुरू असल्याचा फायदा घेत भारतीय संघ राज्याचा अविभाज्य घटक असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सर्व सामान्य पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला त्याचा तीव्र निषेध..सोबतच ज्यांनी आमच्या देश बांधवांवर हल्ला केला त्या सर्वांना टिपून टिच्चून काढा, जाहीर पाठिंबा….’

अतिरेक्यांवर दहशत बसावी- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले की, 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. तशीच दहशत येथे देखील बसवण्याची अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

e bingo