भुसावळमध्ये कुत्र्यांची दहशत, वर्षभरात 4 हजार 477 नागरिकांना कुत्र्यांचा चावा


वाल्मिक जोशी (प्रतिनिधी) भुसावळ : भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांमुळे भुसावळकरांची घाबरगुंडी उडाली आहे. कधी कुणाला कुठे भटका कुत्रा चावा घेईल याचा काही नेम नाहीये. कारण वर्षभरात भुसावळमध्ये तब्बल 4 हजार 477 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. म्हणजे दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. 

जळगावच्या भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना अक्षरक्षा जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय.. याचं कारण म्हणजे शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना. शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रमुख रस्ते आणि सर्वच भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालतायत. भुसावळमध्ये वर्षभरात तब्बल 4 हजार 477 जणांना भटक्या कुत्र्यांने चावा घेतला आहे. त्यामुळे भुसावळमध्ये दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटके कुत्रे चावा घेताहेत.  भटक्या कुत्र्यांचा शहरात एवढा धुमाकुळ सुरू असताना नगर परिषद प्रशासन काय करतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र नगर परिषद प्रशासनाचं या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे लक्ष नाही आहे.

हेही वाचा : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

 

भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत : 

भुसावळमधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत असून दिवसाला सरासरी 12 ते 13 जणांवर कुत्र्यांचा हल्ला होतो. लहान मुलांना चावा घेतल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण दोन महिन्यांपासून रखडलंय. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 30 लाखांचा निधी मंजूर असून निर्बिजीकरणाचं ठेकेदाराला दिलेलं काम तांत्रिक अडचणीमुळे रखडलं आहे. 

आतापर्यंत वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी साडे चार हजार नागरिकांना चावा घेतलाय. मात्र पालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाहीय. सांगलीत संभाजी भिडे यांनी कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. आणि भटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आलीय. तसंच भुसावळ पालिकाही कोण्या मोठ्या नामांकीत व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतल्यावरच याकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न भुसावळकर विचारत आहेत. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best slots to play