तरुणाला नग्न करुन हत्या करणारा सिंधुदुर्गचा आका कोण? वैभव नाईकांच्या आरोपांनी खळबळ


Sindhudurg Crime: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच सिंधुदुर्गातूनदेखील एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका तरुणाला नग्न करुन त्याची हत्या करण्यात आलीय. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी यासंदर्भातली एक पोस्ट फेसबूकवर शेअर केलीय. वैभव नाईकांचे आरोप काय जाणून घेऊया.

वैभव नाईकांचे आरोप काय?

सिंधुदुर्गमधील बिडवलकर नावाच्या तरुणाची 22 हजारांसाठी हत्या करण्यात आली.  या हत्या प्रकरणातील शिवसेनेचा तो आका कोण?, असा सवाल वैभव नाईकांनी केला आहे.बिडवलकर हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशी करावी अशी मागणी वैभव नाईकांनी केली आहे.  तसंच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती बीडपेक्षा गंभीर असल्याचा आरोप नाईकांनी केला आहे. ‘हत्या करणारा आरोपी शिवसेनेचा पदाधिकारी, स्थानिक आमदारांकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न असून हत्या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप वैभव नाईकांनी केला आहे. 

प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण काय आहे?

कुडाळ तालुक्यातील चेंदवन गावातील प्रकाश बिडवलकरचे पैसे देत नसल्याच्या रागातून मार्च 2023 ला अपहरण करण्यात आले होते. अपहरण केल्यानंतर त्याला एका आरोपीच्या घरात डांबून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये सिद्धिविनायके उर्फ प्रकाश बिडवलकरचा मृत्यू झाला होता. मयत प्रकाश बिडवलकर याला सातार्डा येथील जंगल भागातील स्मशानभूमीत जाळलं. त्यानंतर प्रकाशची राख आणि हाडे तेरेखोल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हत्या प्रकरणाचा आता दोन वर्षानंतर उलगडा लागला आहे. त्यानंतर कुडाळ पोलिसांनी संशयित चार आरोपींना अटक केलीय. आर्थिक कारणावरुन केलेल्या मारहाणीत प्रकाशचा मृत्यू झाला असल्याची प्रतिक्रिया एसपी सौरभ कुमार यांनी दिली आहे.

बीड हत्या प्रकरणापेक्षा सिंधुदुर्गमधील हत्या प्रकरण गंभीर असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. या प्रकरणाची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करुन कौकणाचा दौरा करणार असल्याचंही राऊतांनी सांगितलं.

एकीकडे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्याचं राजकराण चांगलंच तापलंय. या प्रकरणातील आरोपी अटकेत असून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येतेय. तर दुसरीकडे प्रकाश बिडवलकर प्रकरणही गंभीर असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी वैभव नाईकांनी केलीय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

welcome bonuses casino