आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्ध
.
पत्रात म्हटले की, दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान वाडीयापार्क अहील्यानगर येथे 67 वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागातील महाराष्ट्र केसरी वजनगटातील अंतिम फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्या कुस्तीस आपण गादीवर मुख्य पंच म्हणुन काम करत होता. कुस्ती दरम्यान आपण दिलेल्या चितपटीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला, पै. शिवराज राक्षे याने तुम्ही दीलेल्या निर्णयावर नाराज होऊन पंचाना मारहान केली . पंचाना झालेल्या मारहानी बाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडुन पै. शिवराज राक्षेवर शिस्तभंगाची कारवाई करत ३ वर्षाची स्पर्धा सहभाग बंदी घालण्यात आली.
आपण दिलेल्या चितपटीच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रामध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण तयार झाले व उलट सुलट चर्चा होऊ लागल्या हे सर्व बाबींचे आवलोकन करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कुस्तीच्या निर्णयाबाबत एक चौकशी समिती स्थापण केली होती .चौकशी समितीचे प्रमुख विलास कथुरे यांनी चौकशी समितीचा अहवाल दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास सादर केला.
सदर अहवालामध्ये आपणास दोषी धरण्यात आले असल्याने आपल्याघर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून 3 वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपणास याबाबत आपणास आपले मत मांडायचे असल्यास पुढील 7 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास लेखी स्वरूपात आपले मत मांडावे.
