झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या अन् मशरूम, धक्कादायक प्रकार समोर!


Expired chapatis: सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. साबणापासून जेवणापर्यंतच्या सर्व गोष्टी घरबसल्या मागवता येतात. पण सर्वकाही सोयीस्कर मिळत असताना या यंत्रणेतून धक्कादायक गोष्टीही समोर येतात. उल्हासनगरात असा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढळून आले आहेत. मनसेने केलेल्या पाहणीत हा मुदत संपलेला माल कार्यकर्त्यांना आढळला. यानंतर परिसरातून संताप व्यक्त केला जातोय. 

झेप्टोच्या डिलिव्हरीमध्ये निकृष्ट किंवा मुदत संपलेला माल येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी कार्यकर्त्यांसह उल्हासनगरच्या जवाहर टॉकीज परिसरातील असलेल्या झेप्टोच्या गोदामाला भेट देत पाहणी केली. 

यानंतर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना जे दिसलं ते फारच किळसवाणं आणि संतापजनक होतं. यावेळी तिथे मुदत संपलेल्या रेडी टू इट चपात्या आणि मशरूमचे पॅकेट आढळून आले. तर दुसरीकडे स्विगीच्या गोदामात व्हेज आणि नॉनव्हेज फ्रोजन पदार्थ एकाच फ्रीजरमध्ये ठेवले जात असल्याचं समोर आलं. 

या दोन्ही प्रकारांची प्रकारांबाबत मनसेने तिथल्या व्यवस्थापनाला जाब विचारत यात सुधारणा करण्याची मागणी केली. या प्रकारांमुळे झेप्टोकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

lucky slots